सावित्रीबाई यांच्याबद्दल कविता

            

                सावित्रीबाई फुले

काल तू होतीस म्हणून आज आम्ही आहोत माई..
नाहीतर आम्हाला स्वयंपाकघर-न्हाणीघर-देवघर यापलिकडे अस्तित्वच नव्हतं..

तू उंबरठा ओलांडला नसता तर आम्ही आजही उंबरठ्याआडच राहिलो असतो..
खिडकीतून दिसणार्‍या टीचभर आभाळात नशिबातील अमावस्या-पौर्णिमा मोजत बसलो असतो..

तू खाल्ल्या शिव्या-शाप म्हणून आम्ही आज 'आशीर्वाद' जगतो आहोत..
तुझ्या अंगावर फेकले होते शेण, दगड आणि माती पण अक्षर ओळखीने आज आम्ही स्वर्गात नांदतो आहोत..

तुझा लढा आमच्यासाठीचा.. काल इतिहास सांगून गेला..
आज वर्तमानात तुझ्या लेकी माई.. भविष्य घडवत आहेत!!
तुझ्या आजन्म ऋणी.. तुझ्या लेकी आज तुझ्या मार्गावर चालत आहेत..


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
💐💐💐

Comments

Popular posts from this blog